Pimpri : आंतर चर्च फुटबॉल स्पर्धेत एस एफ एक्स संघाला विजेतेपद 

एमपीसी न्यूज – यूथ फॉर क्राइस्ट फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या आंतर चर्च फुटबॉल स्पर्धेत चिंचवड येथील एस एफ एक्स फुटबॉल संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात त्यांनी पिंपरी येथील चर्च ऑफ गॉड संघाचा 1-0 असा पराभव केला.

चिंचवडमधील सॉकर यार्ड, काकडे पार्क येथे ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी झाले होते. स्पर्धेच्या अंतिम  सामन्यात चिंचवड येथील एस एफ एक्स फुटबॉल संघाने पिंपरी येथील चर्च ऑफ गॉड संघाचा 1-0 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. विजेत्या संघास ८८८८ रुपये रोख व करंडक तर उपविजेत्या संघास ५५५५ रुपये रोख व करंडक प्रदान करण्यात आला. ‘सेव्हन अ साईड’ असलेल्या या स्पर्धेत प्रत्येक संघात एक महिला खेळाडू अनिवार्य असल्याने तरुणींचा सहभाग लक्षणीय होता.

ह्या स्पर्धेचे आयोजन अध्यक्ष संदेश बोर्डे यांनी केले होते. या स्पर्धेसाठी प्रमुख म्हणून स्लम सॉकरचे फाउंडर विजय बारसे सर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्रीडा विभागाचे सभापती तुषार हिंगे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे, उद्योजक विश्वास दळवी व राजेंद्र जाधव, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस मयूर जयस्वाल, सेवादल अध्यक्ष मकरध्वज यादव, माजी एन एस यू आय अध्यक्ष विशाल कसबे, वसंत गजभीव, जॉन गजभीव, प्रशांत केदारी, शीतल पवार, जॉयसी जोसेफ, धर्मगुरू डोंगरदिवे, रेजि थॉमस, डॅनियल अँथनी, फिलोमन म्हात्रे, सुधीर अवचिते, कोशी चेरीयन, येशूदास सायना आदी उपस्थित होते.

स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संदेश बोर्डे, स्नेहल डोंगरदीवे, प्रशांत बनकर, डॅनियल दळवी, स्नेहल गायकवाड, विशाल दौंडे, बिनू चेरीयन, कुशल सोज्वळ, फ्रँक पीटर, संदीप गायकवाड, संतोष साळवे, अमोल कर्डक, कुणाल साखरपेकर, आशिष गालफाडे, गौरव खटाने, हनोक पुजार, रोहित पाटोळे स्टीफन बोर्डे, संदीप पारवे, अजय उत्तेकर यांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.