Shabnam Khan : शबनम खान यांच्यावर ‘अल्पसंख्याक सेल’च्या तालुकाध्यक्षपदाची पुन्हा जबाबदारी

एमपीसी न्यूज – मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या तालुकाध्यक्षपदी शबनम खान (Shabnam Khan) यांची पुनर्नियुक्ती, तर जुबेर सवार यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. शबनम खान यांचे अल्पसंख्याक विभागातील काम चांगले असल्याने त्यांना पुन्हा जबाबदारी देण्यात आली असल्याचे गौरवोद्गार आमदार सुनील शेळके यांनी काढले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश काकडे, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष आमीर (बाबा) मुलाणी, युवक शहराध्यक्ष आशिष खांडगे, माजी कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, सचिन मुर्हे, अदनान जमादार आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Punya Bhushan Award : ज्येष्ठ उद्योजक बाबा कल्याणी यांचा पुण्यभूषण पुरस्काराने गौरव, दिग्गजांची उपस्थिती

आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पसंख्याक जैन, ख्रिश्चन, पारसी, नवबौद्ध आणि मुस्लिम समाजातील महिलांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन, असा विश्वास शबनम खान (Shabnam Khan) यांनी व्यक्त केला.

पक्षनिष्ठा व पक्ष बांधणीसाठी शबनम भाभी धाडसाने काम करत असल्याने त्यांची पुनर्नियुक्ती उचित असल्याचे आमदार शेळके म्हणाले. गणेश काकडे यांनी देखील त्यांच्या कार्यपद्धतीचा गौरवोल्लेख करत अभिनंदन केले. बाबा मुलाणी यांनी प्रास्ताविक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.