Pimpri : शाडूच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा   

एमपीसी न्यूज – आपण निसर्गातील प्रत्येक घटकांचे संरक्षण करण्यासाठी कार्यरत आहात. प्रत्यक्ष कृतीशीलही आहात. ज्यांना शक्य आहे ते वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, नदीस्वच्छता यासारखे उपक्रम करीत आहेतच परंतु सावरकर मंडळ याच बरोबर सण उत्सव साजरे करताना आपला आनंद व्दिगुणित करुन पर्यावरण रक्षणासाठी विविध उपक्रम राबवित असते. निगडीतील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या महिला विभागाच्या वतीने दि. १८  आणि २५ ऑगस्ट रोजी या शाडूच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजित केली आहे, अशी माहिती स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे सचिव भास्कर रिकामे यांनी दिली. 

याही वर्षी महिला विभागाने (५ वे वर्ष) शाडूच्या गणपती मूर्ती बनवण्यासाठी प्रशिक्षण देऊन प्रत्यक्ष मूर्ती तयार करुन घेण्याची कार्यशाळा आयोजित केली आहे. ही कार्यशाळा दि. १८ आणि २५ ऑगस्ट रोजी होणार आहे. भिजवलेली तयार शाडूमाती व रंग आपल्याला आम्ही देणार आहोत. या साहित्यासाठी येणारा खर्च रु. १०१/- भरुन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी सावरकर मंडळात किंवा याच 9028546415 या नंबरवर व्हॉटसअप करावी. त्यात नाव, पत्ता पाठविण्यात यावा, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे सचिव यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.