Talegaon Dabhade – शाह विद्यालयात शानदार पदप्रदान समारंभ संपन्न

एमपीसी न्यूज – विद्यार्थी परिषदेच्या प्रतिनिधित्वाची (Talegaon Dabhade) मिळालेली संधी नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी आहे. स्वीकारलेल्या पदाची कामे नेमकी कोणती ती ओळखून विद्यार्थी प्रतिनिधींनी ती यशस्वी करण्यासाठी शिक्षक, पालक आणि इतरांशी संवाद साधत राहिले पाहिजे. पदाच्या जबाबदाऱ्या ओळखल्यास नेतृत्वगुणांचा विकासाची दिशा निश्चित होईल, असे आवाहन प्रेस फाउंडेशनचे अध्यक्ष अमिन खान यांनी केले. 
तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या कांतीलाल शाह विद्यालयात बुधवारी (10 ऑगस्ट) आयोजित ‘इन्व्हेस्टीचर सिरेमनी’ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
प्रेस फाउंडेशनचे अध्यक्ष अमिन खान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभास संस्थेचे विश्वस्त शैलेश शाह, डॉ. शाळीग्राम भंडारी, रेश्मा फडतरे, राजेश बारणे, विलास भेगडे, प्राचार्या पद्मिनी तेजानी,  उप प्राचार्य वैशाली शिंदे आदि उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थी परिषदेच्या जल, अग्नी, पृथ्वी आणि वायू  या प्रमुख समित्यांसह इतर शालेय समित्यांच्या नवनिर्वाचित विद्यार्थी प्रतिनिधींना मान्यवरांच्या हस्ते पदे प्रदान करण्यात आली. बँड पथकाच्या तालावर शिस्तबद्ध संचलन, मानवंदना, बॅजेस पिनिंग, फ्लॅग मारचिंग आणि सामुदायिक शपथ यामुळे
(Talegaon Dabhade) कार्यक्रमाची उंची वाढली.

समारंभाचे अध्यक्ष अमिन खान यांनी ‘इन्व्हेस्टीचर सिरेमनी’चे महत्व स्पष्ट केले. डॉ. भंडारी यांनी व्यक्तिमत्त्व विकासाची संधी या पदप्रदान समारंभामुळे हाती आली असून झोकून देत काम करण्याचे आवाहन केले.
प्राचार्य पद्मिनी तेजानी म्हणाल्या, की विद्यार्थी प्रतिनिधींनी कार्यकर्ते तयार करण्यापेक्षा नेतृत्ववान विद्यार्थी घडतील, अशी कामगिरी करून दाखवली पाहिजे. तुमचे काम पाहून इतर विद्यार्थी देखील नेतृत्ववान होतील असे प्रेरणादायी काम करा.
शाह व भंडारी यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
शिक्षिका उषा टोनपी व मानसी देशमुख, क्रीडा शिक्षक पुरुषोत्तम मोरे आणि सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. सूत्रसंचालन अदिती मुदलीयर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.