Shahid Afridi Test Positive : पाकिस्तानी क्रिकेटर ‘शाहिद आफ्रिदी’ला कोरोनाची बाधा

Corona hits Pakistani cricketer Shahid Afridi

एमपीसी न्यूज – पाकिस्तान क्रिकेट संघांचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याला कोरोनाची लागन झाली आहे. शाहिद आफ्रिदीने याबाबत ट्विट करत त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे.

‘बीबीसी’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.  शाहिद आफ्रिदीने याबाबत केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘गुरुवार पासून मी आजारी होतो, माझे सर्व शरीर दुखत होते. दुर्दैवानं माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आशा करतो की मी याच्यातून लवकर बरा होईन, इन्शाल्ला……

दरम्यान, शाहिद आफ्रिदीच्या या ट्विटनंतर पाकिस्तानी क्रिकेट प्रेमींना धक्का बसला आहे. शाहिद या आजारातून लवकर बरा व्हावा, अशी प्रार्थना त्याच्या चाहत्यांकडून करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.