BNR-HDR-TOP-Mobile

Pune : पुण्याचे मेजर शशीधरन नायर काश्मिरात हुतात्मा…

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – जम्मू- काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांनी घडवलेल्या इम्प्रुवाइज्ड एक्स्प्लोझिव्ह डिव्हाइसच्या (आयईडी) स्फोटात पुण्यातील मेजर शशीधरन नायर शहीद झाले .ते 33 वर्षाचे होते . शशी नायर हे पुण्यातील खडकवासला येथे राहत होते . नियंत्रण रेषेजवळ गस्त घालणाऱ्या सैन्याच्या पथकाला लक्ष्य करण्यासाठीच दहशतवाद्यांनी आयईडीचा स्फोट घडवला.

नायर फर्ग्युसन कॉलेजचे माजी विद्यार्थी आणि एनसीसी कॅडेट होते. 11 वर्षांपासून ते सैन्यात कार्यरत होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी तृप्ती नायर या आहेत . त्या पुण्यातील खडकवासला येथे राहतात.राजौरी येथे मानवंदना दिल्यानंतर पार्थिव विमानाने पुण्याला पाठवले जाणार आहे . दुपारी त्यांचे पार्थिव पुण्यात पोहोचेल . त्यांच्यासोबत एक जवानही शहीद झाला असल्याचे समजते .

 

 

 

 

HB_POST_END_FTR-A4

.