BNR-HDR-TOP-Mobile

Pune : 2 जानेवारीला रजा संपून त्यांनी कर्मभूमीकडे परतण्यासाठी कुटुंबीयांचा निरोप घेतला तो कायमचाच …

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – कुटुंबियांना भेटण्यासाठी मेजर शशिधरन पुण्यात त्यांच्या राहत्या घरी खडकवासला येथे आले होते . 2 जानेवारीला रजा संपून त्यांनी कर्मभूमीकडे परतण्यासाठी निरोप घेतला तो कायमचाच …

वयाच्या अवघ्या 33 व्या वर्षी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पेरलेल्या आयईडीच्या स्फोटात शशीधरन शहीद झाले. सकाळीच कुटुंबीयांशी हितगुज झाले होते . आणि अचानक सायंकाळी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ते शाहिद झाल्याची बातमी घरापर्यंत धडकली . या घटनेने परिसरातही शोककळा पसरली आहे . मेजर नायर शहीद झाल्याचे वृत्त समजताच परिसरातील नागरिक आणि नातेवाईकांनी नायर यांच्या घराबाहेर गर्दी केली.नायर यांच्या कुटुंबियांना धीर देताना नागरिकांचेही डोळे पाणावल्याचे चित्र दिसून येत होते .

जम्मू – काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांनी घडवलेल्या इम्प्रुवाइज्ड एक्स्प्लोझिव्ह डिव्हाइसच्या (आयईडी) स्फोटात शुक्रवारी पुण्यातील मेजर शशी नायर शहीद झाले. मेजर नायर यांचे कुटुंबीय गेल्या 35 वर्षांपासून खडकवासला परिसरात राहत आहेत . शशी यांचे वडील विजय यांचे नऊ वर्षापूर्वी त्यांचे निधन झाले आहे. तर मेजर नायर यांची आई अजूनही क्लास घेतात . त्यांच्या पश्चात पत्नी तृप्ती आणि आई लता असा परिवार आहे.

HB_POST_END_FTR-A4

.