Pimpri : शाहीर योगेश स्मृतीगंध पुरस्कार प्रदान कार्यक्रम बुधवारी

एमपीसी  न्यूज –   महाराष्ट्र शाहीर परिषद आयोजित सातवा ‘स्व.शाहीर योगेश स्मृतिगंध पुरस्कार 2018’ सांगली येथील शाहिरा अनिता खरात यांना जाहीर झाला आहे. 
निगडी येथील मनोहर वाढोकार सभागृह येथे बुधवार दि. 24 ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजता पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र शाहीर परिषदेचे अध्यक्ष शाहीर दादा पासलकर आहेत. ज्ञानप्रबोधिनी, निगडीचे केंद्रप्रमुख वा.ना.अभ्यंकर यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र शाहीर परिषदेचे  अध्यक्ष शाहीर दादा पासलकर यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष भाऊसाहेब भोईर  कार्यक्रमाचे उद्घाटक असून पिंपरी-चिंचवड महानगरपालिका  सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, माजी उपमहापौर शैलजा मोरे, नगरसेवक राजू मिसाळ, शिक्षण समिती उपसभापती शर्मिला बाबर, नगरसेवक अमित गावडे, शिवसेना पिंपरी विधानसभा महिला संघटिका सरिता साने, नगरसेवक सचिन चिखले, हॉटेल व्यावसायिक संघटना (पुणे) अध्यक्ष पद्मनाभ शेट्टी आदी उपस्थित राहणार आहे.
पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर मंगल थिएटर्सनिर्मित शाहीर होनाजी-बाळा यांच्या जीवनावरील नाट्यकृती तसेच पुरस्कारार्थी शाहिरा अनिता खरात यांच्या पोवाड्यांचा विशेष कार्यक्रम होईल. संजीवनी महिला शाहिरी पथकाने या सोहळ्याचे संयोजन केले असून मुख्य निमंत्रक महाराष्ट्र शाहीर परिषद, पुणे जिल्हाध्यक्ष शाहीर प्रकाश ढवळे आणि स्वागतप्रमुख पिंपरी-चिंचवड शहर भाजपा उपाध्यक्ष राजेंद्र बाबर यांनी विनाशुल्क असलेल्या या कार्यक्रमाचा लाभ सर्व रसिकांनी आवर्जून घ्यावा, असे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.