IPL 2021 : शाहरुख खानच्या कोलकता नाइट रायडर्सचा हैदराबाद वर 10 धावांनी विजय 

एमपीसी न्यूज – शाहरुख खानच्या कोलकाता नाइट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादवर 10 धावांनी विजय मिळवला. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. नितीश राणा आणि राहुल त्रिपाठी यांच्या दमदार अर्धशतकी खेळींच्या जोरावर कोलकाताने 20 षटकात 6 बाद 187 धावा उभारल्या. प्रत्युत्तरात हैदराबादला 20 षटकात 5 बाद 177 धावांपर्यंत मजल मारता आली. कोलकाताचा नितीश राणा सामनावीर ठरला.  

कोलकाताच्या शुबमन गिल आणि नितीश राणा यांनी सलामीला येत पाच षटकात 45 धावा उभारल्या. राशिदने पहिल्याच षटकात शुबमन गिलला वैयक्तिक 15 धावांवर बाद केले. नितीश राणाने राहुल त्रिपाठीला सोबत घेत 12व्या षटकात संघाचे शतक पूर्ण केले. राहुलनेही आक्रमक पवित्रा धारण करत 28 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. राहुल 29 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांसह 53 धावांची खेळी करून बाद झाला.

राहुलनंतर आलेला आंद्रे रसेलला अवघ्या 5 धावा करता आल्या. त्यानंतर मोठा फटका खेळण्याच्या नादात राणा बाद झाला. राणाने 54 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांसह 80 धावा केल्या. मॉर्गनही स्वस्तात माघारी परतला. मोहम्मद नबीने या दोघांना लागोपाठ चेंडूंवर बाद केलेे. दिनेश कार्तिकने 9 चेंडूत नाबाद 22 धावांची खेळी केल्यामुळे कोलकाताला दोनशे धावांच्या जवळ पोहोचता आले. हैदराबादकड़ून राशिद खान व नबी यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.

_MPC_DIR_MPU_II

कोलकाताच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात चांगली झाली नाही. दुसऱ्या षटकात सलामीवीर डेव्हि़ड वॉर्नर यष्टीपाठी झेलबाद झाला. वृद्धिमान साहा त्रिफळाचित झाला. त्यानंतर जॉनी बेअरस्टो आणि मनीष पांडे यांनी हैदराबादला सांभाळले. 8व्या षटकात हैदराबादने आपले अर्धशतक साकारले. बेअरस्टो आणि पांडे यांनी उपयुक्त भागीदारी करत संघाला अडचणीतून बाहेर काढले. 12व्या षटकात बेअरस्टोने आपले अर्धशतक पूर्ण केले.

अर्धशतकानंतर बेअरस्टो कमिन्सच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 5 चौकार आणि 3 षटकारांसह 55 धावांची खेळी केली. नबी 14 धावांची भर घालून झेलबाद झाला. दुसऱ्या बाजुला असलेल्या मनीष पांडेेने अर्धशतक झळकावले. त्यानंतर मनीष पांडेने 3 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 61 धावांची खेळी केली. मात्र, संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. कोलकाताकडून प्रसिध कृष्णाने सर्वाधिक 2 बळी घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.