Shahunagar accident : शाहुनगर येथे अपघात, आईच्या डोळ्या देखत मुलाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : शाहुनगर येथे आज सकाळी झालेल्या अपघातात शालेय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. अथर्व अल्हाने असं या विद्यार्थ्याच नाव (Shahunagar accident) असून तो अपल्या आईसोबत शाळेसाठी जात असताना हा अपघात झाला आहे. यामध्ये त्याची आई किरकोळ जखमी झाली आहे.

आज सकाळी शाहूनगर येथे गणपती चौक ,(अमित कॉर्नर) बी आर टी बस स्टॉप चौक येथे मालवाहतूक ट्रकच्या धडकेने अथर्व आळणे ,इयत्ता आठवी प्रतिभा स्कूल ,राहणार सोहेल रेसिडेन्सी, स्पाईन रोड या विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. विद्यार्थ्याची आई व विद्यार्थी टू व्हीलर वर शाळेत जात असताना मालवाहतूक ट्रकने त्यांना जोराची धडक दिली. सुदैवाने आई ला जास्त मार लागला नाही. येथे असलेल्या स्पीडब्रेकर वर खड्डे असल्याने ते एक अपघाताचे कारण ठरल्याचं प्रत्यक्षदर्शीच म्हणं होत. पाठून येत असलेल्या ट्रकने अक्षरक्षा त्या मुलाला फरफटत नेले.

Pimpri News : नेपाळी मार्केटमध्ये 93 फेरीवाल्यांना मिळाले हक्काचे गाळे

चौकाजवळील स्टॉलचालकाने सांगितले की रोड च्या पलीकडे सिग्नल जवळ सकाळी 7.15 वा च्या सुमारास भीषण अपघात झाला होता. तेथे लोकांची खूप गर्दी जमली होती.

अमित गोरखे, प्रदेश सचिव भाजपा हे स्थानिक कार्यकर्त्यांसोबत तेथे गेले हॊते. ते  म्हणाले की  अपघात खुपच भीषण होता.सकाळच्या वेळी या ठिकाणी अतिशय गर्दी, चुकीच्या पद्धतीने वाहतूक, कारखान्यांच्या, शाळेच्या बसेस मोठे मोठे ट्रक यामुळे हा चौक अतिशय धोकादायक झाला असून या ठिकाणी पूर्ण वेळ ट्रॅफिक हवालदार असणे, गरजेचे आहे, त्याचबरोबर स्पीड ब्रेकर आणखी जास्त असावेत अशी लेखी मागणी आम्ही त्वरित करीत आहोत, या ठिकाणी सिग्नल असूनही त्या ठिकाणी कोणीही सिग्नल पाळत नाहीत हे या अपघाताचे प्रमुख कारण आहे ,असे प्रत्यक्षदर्शी अपघात पाहिल्यावर मला जाणवले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.