Vadgaon Maval शैलेश वहिले यांना मावळ क्रिकेट भूषण पुरस्कार

एमपीसी न्यूज – ओल्ड इज गोल्ड क्रिकेट असोसिएशनच्या वतीने व बुलंदमावळ, 11 हनुमान, विजयनगर, अजिंक्य, यंगस्टार, फ्रेंन्डस या सर्व क्रिकेट क्लबच्या पुढाकाराने शैलेश पोपटराव वहिले यांना मावळ क्रिकेट भूषण पुरस्कार देण्यात आला. ओल्ड इज गोल्डच्या स्नेहसंमेलन प्रसंगी बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये वहिले यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी उपसरपंच अविनाश चव्हाण, नगरसेवक राहूल ढोरे, राजु कुलकर्णी, राजु सुर्वे, विजय काकडे, शैलेन्द्र ढोरे, अशोक भिलारे, नामदेव घोलप, अनिल कोद्रे, सुरेश ढोरे, संतोष चव्हाण, गणेश गायकवाड, यशवंत तांबे, संतोष वाघमारे, नितीन धोंगडे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला.

मावळ तालुक्यातून आपला सहकारी शैलेश वहिले यांनी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली, स्टिव स्मिथ, प्रवीण आम्रे, अॅलन डोनाल्ड, राॅबिन उत्तापा यांच्या सानिध्यात त्यांना आयपीएलमध्ये सराव करण्याची संधी मिळाली असता व परदेशी दौर्‍यात साऊथ आफ्रिका ‘अ’ संघासोबत मॅच खेळण्याची संधी मिळाली आजवर त्यांनी ग्रामीण भागातील खेळाडूंना राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धा खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली व त्यांना औरंगाबाद येथे राज्यस्तरीय श्री छत्रपती संभाजी महाराज समाजभूषण पुरस्कार देण्यात आला. त्यांची आजपर्यंतची कामगिरी लक्षात घेता त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

कार्यक्रमाचे सयोजन संतोष खैरे, सचिन आफळे, महेश कुलकर्णी, विनय सुर्वे, आनंद बाफना ,सचिन जाधव, ललित शहा, सुनील कुलकर्णी, नितीन ढमाले यांनी केले. सूत्रसंचालन अभय बवरे व रजनिश ढोरे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.