Shanivarwada : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने थोरले बाजीराव पेशवे यांची जयंती साजरी

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पुणेच्या वतीने थोरले बाजीराव पेशवे यांची जयंती पुण्यातील शनिवारवाडा (Shanivarwada) येथे रविवारी (दि.21) साजरी करण्यात आली. या निमित्त पुण्यात दुचाकी अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

अभिवादन रॅलीची सुरवात कोथरूड येथील छत्रपती शिवाजी पुतळा येथून झाली व समारोप शनिवारवाडा येथे झाला. या रॅलीमध्ये अनेक महिला, पुरुष, जेष्ठ नागरिक, पुरोहित आपल्या पारंपरिक मंगल वेषात सहभागी झाले होते. रॅलीचे मुख्य आकर्षण ठरले, ते म्हणजे पारंपरिक वेषात नटलेले थोरले बाजीराव पेशवे, काशीबाई पेशवे व पेशवे काळातील महिला भगिनी. अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी आपले पारंपरिक खेळ, फुगड्या खेळून एक पवित्र्यमय वातावरण निर्माण केले.

Science Festival : विज्ञान महोत्सवात मुलांनी लुटला चित्रकलेचा आनंद

या कार्यक्रमासाठी खास बीडवरून महिला (Shanivarwada) पदाधिकारी आल्या होत्या व आपल्या भावना त्यांनी कवितेतून व्यक्त केल्या. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे, थोरले बाजीराव पेशवे नावाने नामांतर करावे ही मागणी केली. यासाठी आवश्यक पत्रव्यवहार केंद्रीय व राज्य सरकारशी करण्यात आला आहे असे सांगण्यात आले. यावेळी वाहतुकीच्या नियमाबाबतीत पोलिसांनी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.