Shapit Gandharv : शापित गंधर्व : लेख ३८ वा

एमपीसी न्यूज :  वाजिद खान.

तो अतिशय प्रतिभावंत संगीतकार, गायक होता. त्याने खूप कमी कालावधीतच स्वतःच्या नावाचा ठसा उमटवला होता. आपल्या भावाच्या साथीने त्याने थोड्याच चित्रपटांना संगीत दिले; पण (Shapit Gandharv ) ते सर्वच्या सर्व चित्रपट यश, कीर्ती मिळवून देणारे होते. तो ‘लंबी रेस का घोडा’ आहे असे सर्वांना वाटत असतानाच वयाच्या केवळ 42 व्या वर्षी तो सर्वांना अखेरचा अलविदा करून जन्नतला निघून गेला.

आपल्या असंख्य चाहत्यांना, समालोचकांना, अन् टीकाकारांना सुद्धा दुःखात टाकून अकालीच अल्ला को प्यारा झालेला आजचा शापित गंधर्व म्हणजेच ‘वाजिद खान’ ऊर्फ साजिद-वाजिद या सुप्रसिद्ध जोडीमधला प्रतिभावंत संगीतकार गायक म्हणजेच वाजिद.

त्याच्या घरी, कुटुंबात संगीताचा वारसा होता. त्याच्या आईचे अन् वडिलांचे वडील म्हणजेच दोन्हीही आजोबा संगीत क्षेत्रातले  मोठे नाव होते. 10जुलै 1977 साली त्याचा जन्म उत्तरप्रदेश मधल्या सहारनपूर येथे झाला. रजिना खान ही त्याची आई, तर उस्ताद शराफत अली खान हे विख्यात की बोर्ड वादक तसेच तबलजी असलेले त्याचे वडील, तर संगीतकार ,अभिनेता साजिद अली खान हा त्याचा भाऊ आहे. त्याचे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील उस्ताद अब्दुल लतिफ खान हेही संगीत क्षेत्रात कार्यरत होते, (Shapit Gandharv )तर नाना उस्ताद फैय्याज खान यांना अतिशय प्रतिष्ठेच्या पद्म पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

त्याचे काका नियाज अहमद अली हे सुद्धा एक उत्कृष्ट  वादक होते. त्यांनाही संगीतसम्राट तानसेन पुरस्काराने गौरविण्यात आले होते. साहजिकच वाजिद अलीचे बालपण अशा महान व्यक्तीच्या सहवासात अन् मार्गदर्शनातच क्रमित झाले. संगीत क्षेत्रातले अतिशय नामवंत असलेल्या किराना घराणाआणि पंजाब घराण्यात वाजिद आणि साजिद या दोन्ही भावंडांनी संगीताचे धडे गिरवले. सुप्रसिद्ध गिटारवादक दास बाबू यांच्याकडे वाजिद अलीने गिटारचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले. त्याला गझल गायनाची खूप आवड होती. खरे तर त्याला गायकच बनायचे होते; प(Shapit Gandharv )ण आयुष्यात आपण जे ठरवतो तेच होते असे नाही ना? त्यांना परमेश्वराने संगीतकार नव्हे, यशस्वी संगीतकार बनवले. अर्थात तो प्रवास मात्र अजिबात सोपा नव्हता; पण मनात ठाम निश्चय करून ही जोडी चित्रपटसृष्टीत आली. अनेक नकार पचवावे लागले. कधी हेटाळणी सुद्धा वाट्याला आली; पण ही जोडी निराश झाली नाही.

याच दरम्यान एका संगीत कार्यक्रमाच्या निमित्ताने या जोडीची भेट झाली बॉलीवूडचा भाईजान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमान खान सोबत. सलमान खान हा सिने मीडियामध्ये एक बॅड बॉय अशी नकोशी ओळख असलेला मेगा सुपरस्टार पण तितकाच वादग्रस्त प्रतिमा असलेल्या व्यक्तिमत्त्वाचा धनी. खरे काय खोटे काय या भानगडीत आपल्याला अजिबात पडायचे नाही; पण या इमेज शिवायही सलमानची एक इमेज अशीही आहे की तो नवोदित पण (Shapit Gandharv ) प्रतिभावंत व्यक्तीला खूप मदत करतो, त्याच्या पाठीशी ठाम उभे राहतो. किती तरी लोकांना त्याने मदत केली अन् ते आज चित्रपटसृष्टीत जबरदस्त नावलौकिक कमावून राज्य करत आहेत.

हिमेश रेशमिया,कॅटरिना कैफ ही नावे फक्त वानगीदाखल. अशीच मदत त्याने या भावंडाना केली. त्याच्या 2000 साली आलेल्या ‘प्यार किया तो डरना क्या’ या लोकप्रिय आणि यशस्वी चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी त्याने या जोडीवर टाकली अन् एकापेक्षा एक सुंदर गाणी देत या जोडीने ती जबाबदारी सार्थपणे पार पाडली. ओढ ली चुनरिया, क्योंकि तुम हो हटके अशी गाणी प्रचंड गाजली अन् एका रात्रीत ही जोडी प्रसिद्धीझोतात आली.

त्यानंतर यांनी एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट देत आपले नाणे खणखणीत वाजवून ते 100 नंबरी असल्याचे सिद्ध केले. साजिद-वाजिद यांनी जोडीने ‘क्या ये प्यार है’ (2002), ‘गुनाह’ (2002), ‘चोरी चोरी’ (2003), ‘द किलर’ (2006), ‘शादी करके फस गया यार’,‘जाने होगा क्या’ (2006) या सारख्या अनेक चित्रपटांना संगीत दिले. मात्र त्यांची जोडी चांगलीच  जमली ती दबंग सलमान खान सोबत. ‘वांँटेड’ (2009), ‘दबंग’ (2010), ‘एक था टाइगर’ (2012), ‘तुमको ना भूल पाएंगे’ (2002), ‘तेरे नाम’ (2003), ‘गर्व’ (2004), ‘मुझसे शादी करोगी’ (2004), ‘पार्टनर’  ‘ (2007), ‘हैलो ब्रदर (2008), ‘गॉड तुस्सी ग्रेट हो’ (2008), ‘‘मैं और मिसेज खन्ना’(Pune) (2009), ‘वीर’ (2010),  ‘दबंग 2’ (2012) आणि ‘दबंग 3’ (2019) ही काही नावे सुध्दा वानगीदाखलच. याचसोबत त्यांनी ‘ग्रैंड मस्ती’ (2013)  ‘सत्यमेव जयते’ (2018) अशा इतर चित्रपटांनाही संगीत दिले.

यातले बरेचसे चित्रपट कमालीचे यशस्वी ठरले होते. त्यातली गाणी आजही कानाला अवीट गोडी देतात.
सगळे चांगले चालले होते. या जोडीने आपल्या नावाची कीर्ती दशोदिशात दिगंत केली होती. आता त्यांना काम मिळवण्यासाठी कोणाचेही उंबरे झिजवावे लागत नव्हते. त्यांच्या स्वतःच्या अटीवर त्यांना मोठमोठ्या बॅनर्सचे चित्रपट मिळू शकत होते. याचसोबत स्टेज शो, संगीतदौरे, वेगवेगळे इव्हेंट्स हे ही चालू होते. यातून नावलौकिकासोबत आर्थिक स्थैर्यही (Shapit Gandharv ) आलेले होतेच. सब कुछ बढिया चालले होते. अन् अचानकपणे आलेल्या कोरोनाच्या आजाराने त्याला गाठले.

आधीपासून त्याला किडनीचा विकार होताच. कोरोनाने अचानकपणे भारतात आल्यानंतर पुढील काही काळातच आपले अक्राळ-विक्राळ रूप धारण केले होते. त्याच्या जबड्यात वाजिदही सापडला. असे म्हणतात त्याचे किडनीचे(मूत्रपिंड) प्रत्यारोपणही झाले होते; (Shapit Gandharv ) मात्र या दोन्ही आजारांनी त्याला एकत्रित गाठले अन् त्यातच त्याचे 1 जून 2020 रोजी मुंबईत निधन झाले. वयाच्या अवघ्या 43 व्या वर्षी तो परत कधीही न येण्यासाठी म्हणून निघून गेला. कायमचा.

झी टीव्हीवरील लोकप्रिय असणाऱ्या ‘सारेगामापा’  या शो मध्ये जज म्हणून ज्यांनी- ज्यांनी त्याला पाहिले, ते सर्व त्याच्या साध्या, सरळ आणि प्रामाणिक स्वभावाच्या प्रेमात पडले होते. (Shapit Gandharv ) होतकरू स्पर्धकांसाठी तो खूप मदतगार सिद्ध होत असे. तो आणखी काही काळ जगला असता, तर नक्कीच खूप मोठा संगीतकार झाला असता; पण जर- तरला आपल्या दृष्टीने असली तरी, वरच्याच्या दृष्टीने काहीही किंमत नसते, खरे ना?

त्याच्या मृत्यूनंतरही त्याच्या भावाने आपल्या नावापुढे त्याचे नाव आधीप्रमाणे लावण्याचे ठरवले आहे. हे एक प्रकारचे निस्सीम बंधूप्रेमच आहे अन् हीच खरी श्रद्धांजलीही आहे.
जाता-जाता त्याच्या काही लोकप्रिय गाण्यांवर नजर टाकूया.

हुड दबंग दबंग
सोनी दे नखरे
ओढ ली चुनरिया
तेरे मस्त मस्त दो दैन
माशाल्ला माशाल्ला
लगन लागी तुझसे मन
चिंता ता  चीता चीता
लाल दुपट्टा
तेरी जवानी बडी मस्त मस्त
सुरीली अखियोंवाली
तूने भी पल भर मे चोरी किया रे जिया
आ रे प्रीतम प्यारे

अल्लाच्या या नेक बंद्याला भावपूर्ण श्रद्धांजली!
विवेक कुलकर्णी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.