Sharad pawar Birthday news : शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त देहूरोड येथे वृक्षारोपण

एमपीसीन्यूज : माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 80 वा वाढदिवस देहूरोड येथे उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त देहूरोड येथील श्री शिवाजी विद्यालय आवारात काँग्रेसचे देहूरोड शहराध्यक्ष हाजीमलंग मारीमुत्तू यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्यात आला. सुमारे 50  आयुर्वेदिक आणि शोभिवंत वृक्षांची लागवड करण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

आज, शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष प्रवीण झेंडे, शिवसेना मावळ तालुका समन्वयक रमेश जाधव, शहरप्रमुख भरत नायडू, राष्ट्रवादीचे जालिंदर राऊत, धनंजय मोरे तसेच श्री शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक थोरात यांच्या हस्तेही वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी श्री शिवाजी विद्यालयातील सर्व शिक्षक वर्ग व कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने संस्थेच्या विविध महाविद्याल्यांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.