Pune News: शरद पवार यांनी महिलांना राजकारणात स्थान मिळवून दिले – रूपाली चाकणकर

एमपीसी न्यूज – राजकारणामध्ये महिलांचा सहभाग मोलाचा असतो. शरद पवार यांनी महिलांना राजकारणात स्थान मिळवून दिले आणि सन्मान प्राप्त करून दिला, असे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केले.

ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर आणि बालगंधर्व कलादालनात शनिवार दिनांक 10 डिसेंबर ते सोमवार दिनांक 12 डिसेंबर असा तीन दिवसीय शरदोत्सव आयोजीत करण्यात आला आहे. यानिमित्त चित्रकार विशाल केदारी यांनी रेखाटलेल्या शरद पवार यांच्या विविध 82 भावमुद्रांच्या चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन आज रूपाली चाकणकर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

Pune News: दुरुस्तीच्या कामामुळे पुणे-लोणावळा लोकलच्या आठ फेऱ्या येत्या मंगळवारपर्यंत बंद

यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ चित्रकार मुरलीधर लाहोटी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर महिला अध्यक्षा मृणालिनी वाणी, सुषमा सातपुते, बाळासाहेब बोडके आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना रूपाली चाकणकर म्हणाल्या की, शरद पवार यांनी महिलांना राजकारणात स्थान मिळवून दिले आणि सन्मान प्राप्त करून दिला. शरद पवार यांचे राजकारणातील योगदान पक्षातील आणि पक्षाबाहेरील व्यक्ती देखील मान्य करतात. पुणे जिल्हा आणि ग्रामीण पुण्याच्या तुलनेत शहरातील मुलींचा जन्मदर कमी दिसून येतो. तो दर सम प्रमाणात आणून वाढदिवसाच्या खऱ्या शुभेच्छा आपण शरद पवार यांना देऊया.

यावेळी ज्येष्ठ चित्रकार मुरलीधर लाहोटी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले. सूत्रसंचालन संवाद पुणेचे सुनील महाजन यांनी केले, तर माजी नगरसेवक उदय महाले यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.