Sharad Pawar : शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार  यांना आज ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून  डिस्चार्ज देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली.

शरद पवार यांना 11 एप्रिल रोजी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 12 एप्रिल रोजी त्यांच्या पित्ताशयावर लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात आली. दोन दिवस हॉस्पिटलमध्ये विश्रांती घेतल्यानंतर आज शरद पवार यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांची तब्येत बरी आहे. देशभरातील जनतेने, चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या. शिवाय दिलेल्या पाठिंब्याबद्दल नवाब मलिक यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या पित्ताशयावर तीन दिवसापूर्वी 12 एप्रिलनंतर यशस्वीपणे पार पडली. या शस्त्रक्रियेनंतर शरद पवार (Sharad Pawar) यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर असल्याची माहिती नवाब मलिक यांनी त्यावेळी दिली होती. शरद पवार हे 11 एप्रिलला ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी प्रतिभा पवार आणि मुलगी खासदार सुप्रिया सुळे होत्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.