Sharad Pawar Live : बंडखोरी करणाऱ्यांना किंमत मोजावी लागेल!

एमपीसी न्यूज : महाविकास आघाडी सरकार (Sharad Pawar Live) एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे अडचणीत आले असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हंटले.  बंडखोरी प्रकरणावर शरद पवार यांनी आता पत्रकार परिषद घेऊन थेट प्रतिक्रिया आणि आवाहन दिले आहे. बंडखोरी करणाऱ्यांना किंमत मोजावी लागेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. 

महाविकास आघाडी सरकार टीकवण्यासाठी सगळे प्रयत्न करू. पण, बंडखोरी करणाऱ्यांना किंमत मोजावी लागेल, त्यांना जे काही म्हणायचे आहे, ते समोर येऊन म्हणावे. वेळप्रसंगी आम्ही बाहेरही पडू.  असे शरद पवार म्हणाले.

Sanjay Raut : शिंदे गटाने 24 तासात परत यावे – खासदार संजय राऊत

शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Sharad Pawar Live) यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी त्यांनी म्हंटले, की माध्यमातून समोर आलेल्या गोष्टी नाकारणे चुकीचे आहे. बाहेर गेलेले आमदार इथे आल्यावर नक्की सेनेसोबत राहतील. बंडखोर आमदार इथे आल्यावर सेनेचे बहुमत सिद्ध होईल. अशी परिस्थिती मी या आधी ही महाराष्ट्रात पाहिली आहे. हे सगळे आमदार इथे आले की बहुमत सिद्ध होईल. आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मविआ सरकार चालू असल्याचे तुम्ही पहाल असे शरद पवार यांनी वक्तव्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.