BNR-HDR-TOP-Mobile

Nigdi : पार्थ यांच्यासाठी शरद पवार यांनी घेतली आझमभाईंची भेट!

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आज भाजपमध्ये असलेले जुने सहकारी आझमभाई पानसरे यांची आज भेट घेतली. मावळ लोकसभा मतदार संघातून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार निवडणूक लढवत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अस्वस्थ असलेल्या आझमभाईंचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न होताना दिसत आहेत.

माजी महापौर व अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष असणाऱ्या आझमभाईंना मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली होती. शरद पवार यांचे निकटवर्ती सहकारी अशी त्यांची ओळख होती. शहरातील राजकीय उलथापालथींनंतर आझमभाईंनी काँग्रेसमध्ये व पुढे भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र भाजपमध्येही सातत्याने उपेक्षा झाल्याने आझमभाई अस्वस्थ आहेत. या पार्श्वभूमीवर तब्येतीची चौकशी करण्याच्या निमित्ताने शरद पवार यांनी आझमभाईंची भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

पार्थ पवार यांना विजयी करण्यासाठी शरद पवार यांनी मतदारसंघातील प्रमुख नेत्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. पार्थ पवार यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी शरद पवार पिंपरीमध्ये आले आहेत. सभेला जाण्यापूर्वी त्यांनी आझम पानसरे यांची त्यांच्या निवसस्थानी जाऊन भेट घेतली.  शरद पवार यांच्या या भेटीत राजकीय खलबतेही झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

.

HB_POST_END_FTR-A1
.