Pune : पुण्याच्या नेतृत्वाबद्दल शरद पवार म्हणतात ‘आता निवडणूक नाही’

एमपीसी न्यूज – पुण्यात शिकताना विविध महाविद्यालयीन निवडणुका या पवार पॅनेल च्या माध्यमातून लढविल्या आणि त्या सर्व जिंकल्या. या निवडणुकीमध्ये विशेषत ग्रामीण भागातील विद्यार्थी हेच पॅनेल मध्ये असत. तेव्हापासून आज अखेर एक वेगळया प्रकारे संघटन करण्याचे काम केले.आज राजकारणातील कारकिर्दीला 52 वर्षे पूर्ण होत  असून पुण्याच्या त्या निवडणुका हाच त्याचा पाया आहे.अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार  पुणे शहराविषयीच्या जुन्या आठवणींना उजाळा सुधीर गाडगीळ यांनी घेतलेल्या मुलाखती दरम्यान दिला. तर आता पुण्याचे नेतृत्व करायला आवडेल का, असा प्रश्न सुधीर गाडगीळ यांनी केला असता. त्यावर ते म्हणाले आता निवडणूक नाही असे सांगत उत्तर देणे टाळले.
जुन्या पुणे शहराच्या छायाचित्रांचे कॉफीटेबल बुक ‘पुणे एकेकाळी ‘आणि स्मरणरम्य दिनदर्शिकेचे प्रकाशन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ‘आठवणीतले पुणे’ या विषयावर सुधीर गाडगीळ यानी शरद पवार आणि श्रीनिवास पाटील यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी या दोन्ही नेत्यांनी महा विद्यालयीन जीवनापासून आज अखेर पर्यंतच्या पुणे शहरातील अनेक आठवणीना उजाळा देखील दिला. तर यावेळी लेखक मंदार लवाटे, पेपरलीफचे संस्थापक जतन भाटवडेकर उपस्थित होते.

पानशेत धरण फुटल्यानंतरची एक आठवण सांगताना शरद पवार म्हणाले की, पानशेत धरण फुटल्यानंतर शहराचे मोठ्या प्रमाणवर नुकसान होते. महाविद्यालयात असताना.आम्हाला फिझिकल एज्युकेशनचे सर होते. त्यांचे घर पाण्यामध्ये वाहून गेले होते. ते अतिशय दुःखी होते. रडत बसले होते. सर सर्व ठीक होईल. असे आम्ही त्यांना सांगत होतो. त्यावर ते म्हणाले जर्मनी ऑलिम्पिक मध्ये मिळवलेले पदक वाहून गेले आहे. त्याचे मला फार दुःख आहे. हे त्यांचे वाक्य कानावर पडताच यातून देशावर आणि खेळावर असलेली निष्ठ दिसते.
तुम्हाला पुण्यात कोणते पदार्थ खाण्यास आवडत त्यावर श्रीनिवास पाटील म्हणाले, एस पी समोर जीवनामध्ये चहा बटाटेवडा,भेळ आणि पदार्थ तेवढ्यात शरद पवार म्हणाले पाटील कासमचा खिमा विसरलात का असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.आम्ही गावाकडून शहरात शिकण्यास आलो. पुण्यात अनेक ठिकाणी फिरलो. त्यावेळी काही हॉटेल मध्ये जेवणासाठी नेहमी जायचो. घरून महिन्याच्या खर्चासाठी पैसे दिले जायचे.त्यामध्ये शरद राव, मी आणि धनाजी आमच्या तिघा मित्राचा खर्च लिहिला असायचा तो खर्च घरी देत असत. आज ही त्यावेळी ज्या वहीमध्ये लिहिला आहे. ती तशी जपून ठेवली आहे.असे आम्ही तिघे मित्र अशा आठवणी श्रीनिवास पाटील यानी यावेळी सांगितल्या

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.