Sharad Pawar : नरेंद्र मोदींना शुभेच्छा देत आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरी पोहोचले शरद पवार

एमपीसी न्यूज : काही दिवसांपूर्वी जुन्नर तालुक्यातील एका शेतकऱ्याने कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आत्महत्या केली होती. याच शेतकऱ्याच्या घरी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी (Sharad Pawar) भेट दिली. या शेतकऱ्याच्या घरी जाऊन शरद पवारांनी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. इतकेच नाही तर या मयत शेतकऱ्यांच्या फोटोचे दर्शनही त्यांनी यावेळी घेतले. 

दशरथ लक्ष्मण केदारी असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. फायनान्स वाले पतसंस्था वाले दमदाटी करतात अपशब्द वापरतात, त्यात शेतमालाला बाजार भाव मिळत नाही. याला केंद्र व राज्य सरकार जबाबदार आहे. मोदींचा शेतीवर कंट्रोल नाही. त्यामुळे जीवनाला कंट्रोल आत्महत्या करत असल्याचं एका चिठ्ठीत लिहून दशरथ केदारी यांनी आयुष्य संपवलं होतं. चिट्ठीच्या शेवटी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

दरम्यान शरद पवार (Sharad Pawar) यांनी या कुटुंबीयांची भेट घेत त्यांची विचारपूस केली. यावेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाची झळ आता बागायती क्षेत्रालाही बसू लागली आहे. त्यामुळेच केदारीन सारखे शेतकरी आत्महत्या करत आहेत. ही घटना दुर्दैवी असून राज्य सरकारने मयत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना योग्य ती मदत देऊन त्याचे पुनर्वसन करावे असेही पवार यांनी यावेळी सांगितले.
https://youtu.be/NfPJSr_DJ2E

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.