Sharad Pawar Speaks on PM Modi: नेहरु यांच्याप्रमाणेच पंतप्रधान मोदीही एलएसीवर गेले- शरद पवार

Sharad Pawar Speaks on PM Modi: Like Nehru, Prime Minister Modi also went to LAC- Sharad Pawar

एमपीसी न्यूज- गलवान, पेंगोंग झील आणि लडाखमधील काही भागात भारत आणि चीन दरम्यान तणावाची स्थिती आहे. अचानक एक दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेह-लडाखचा दौरा करुन सैन्य दलाचे मनोधैर्य वाढवले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या कृतीवर भाष्य केले आहे. अशी स्थिती निर्माण झाल्यानंतर देशाच्या नेतृत्वाला पुढे येऊन लष्कराच्या जवानांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असे त्यांनी म्हटले.

शरद पवार पुढे म्हणाले की, 1962 मध्ये आपण जेव्हा युद्धात पराभूत झालो. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु आणि तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण हे एलएसीवर गेले आणि त्यांनी जवानांचे मनोधैर्य वाढवले. अगदी त्याचप्रमाणे सध्याच्या पंतप्रधानांनी केले आहे. जेव्हा कधी अशी स्थिती निर्माण होते. तेव्हा देशाच्या नेतृत्वाने पुढे येऊन सैनिकांना प्रोत्साहित केलेच पाहिजे.


दरम्यान, गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांदरम्यान झालेल्या हिंसक चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले होते. तर चीनचेही किमान 40 सैनिक मारले गेल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर दोन्ही देशांनी लडाखमध्ये आपली सैन्य क्षमता वाढवण्यास सुरुवात केली होती. भारत आणि चीन दोघांनीही लढाऊ विमानांपासून मोठमोठे शस्त्रास्त्रे तैनात करण्यास सुरुवात केली होती.

भारताने लडाखमध्ये एलएसीवर आपल्या जवनांची संख्या वाढवली. त्याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गलवान खोऱ्यात जखमी जवानांना भेटण्यास गेले. त्यांनी निमू येथे जात जखमी जवानांची विचारपूस करत तयारीचा आढावा घेतला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.