Mumbai: ‘मी माझा रक्षक, मी घराबाहेर पडणार नाही’, माझे सहकारीही बाहेर पडणार नाहीत – शरद पवार

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या संकटाला घाबरण्याचे कारण नाही. सर्वांनी एकत्र येवून लढा देवू. सरकारच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. सूचनांचे पालन केले नाही. तर, मोठी किंमत मोजावी लागेल. ‘मी माझा रक्षक, मी घराबाहेर पडणार नाही’, माझे सहकारीही बाहेर पडणार नाहीत असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कामाचे देखील त्यांनी कौतुक केले.

शरद पवार यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला.

#सर्व कंपन्यांनी कामगारांचे वेतन कापू नये

#उपासमार रोखण्यासाठी हातभारा लावा, उद्योजकांना सल्ला

#सरकार, आरबीआयच्या निर्णयाचे स्वागत

#पीक कर्जाची परतफेड शक्य नाही

#पीक कर्जाला 4 ते 5 वर्षाचे हप्ते पाडून द्यावेत

#राष्ट्रवादीचे खासदार, आमदार एक महिन्याचे वेतन देणार

#शैक्षणिक शुल्काबाबत राज्य सरकार विचार करेल

#कोरोनाच्या संकटाला घारबरण्याचे कारण नाही

#आरोग्य कर्मचारी, पोलीस धोका पत्करुन काम करत आहेत, त्यांचा सन्मान व्हावा

#शरद पवारांकडून मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांचे कौतुक

#ही परिस्थिती लवकर बदलेल

#कामगार, मजुरांसाठी अधिक मदत करण्याची आवश्यकता

#अत्यावश्यक सेवेतील वाहनांना पोलिसांनी अडवू नये

#ईएमआयबाबत राज्य सरकारने विचार करावा

#सूचनांचे पालन केले नाही. तर. मोठी किंमत चुकवावी लागेल

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.