Pune : शरद पवार यांनी केवळ ऐकण्याची भूमिका घेतली : अजित पवार

एमपीसी न्यूज : पुणे (Pune) जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. तर या बैठकीला अनपेक्षितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी हजेरी लावली. त्या दरम्यान अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. या बैठकीला विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या सह जिल्हय़ातील आमदार आणि अधिकारी उपस्थित होते.

Hinjawadi : पावसाळापूर्व कामासाठी हिंजवडी येथील वाहतुकीत बदल

त्या बैठकीनंतर शरद पवार यांनी बर्‍याच वर्षानंतर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला हजेरी लावली आहे. त्याबाबत अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, मी अनेक वर्ष पुणे (Pune) जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम पाहिले आहे. पण मी पहिल्यांदा पवार साहेबांना डीपीडीसीच्या बैठकीला आल्याचे पाहिल आहे.

त्यावर मी सुप्रियाला विचारल. तर काही नाही केवळ जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत काम कस चालत ते पाहण्यास आल्याच तिने सांगितले. शरद पवार यांनी केवळ ऐकण्याची भूमिका घेतली. ते काही अधिक बोलले नसल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना देखील विचारले असता ते म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला शरद पवार आल्याचे पाहून आश्चर्य वाटले. शरद पवार यांनी एवढा वेळ आपल्याला दिल्याचे पाहून (Pune) सर्वांना विनंती केली.

आपण बैठक लवकर संपवू, पण त्यावर पवारसाहेब म्हणाले मला अजिबात घाई नाही. त्यानंतर ती बैठक जवळपास दोन तास चालली. तसेच शरद पवार बैठकी करीता आल्याने आश्चर्यची आणि आनंदची गोष्ट असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Maharashtra : समाज माध्यमांवरील नागरिकांच्या तक्रारीसाठी त्वरित यंत्रणा कार्यान्वित करावी- मुख्यमंत्री

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.