Pune: शरद पवार यांनी रुबी हॉलला भेट देऊन आमदार भारत भालके यांच्या प्रकृतीची केली विचारपूस

Sharad Pawar visited Ruby Hall and inquired about the health of MLA Bharat Bhalke.

एमपीसी न्यूज : पंढरपूरातील मंगळवेढा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती रुबी हॉल क्लिनिकचे डॉ.पी.के. ग्रांट यांनी दिली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांची दुपारी भेट घेतली.

याबाबत डॉ. ग्रांट यांनी सांगितले, शरद पवार यांनी आमदार भालके यांच्या प्रकृतीबाबत चौकशी करण्यासाठी भेट घेतली. परंतु, भालके यांची प्रकृती अतिशय चिंताजनक असून आम्ही आमच्या परीने त्यांना वाचविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहोत. त्यांची ऑक्सिजन पातळी खालावत असल्याचेही त्यांनी सांगितले.

गेल्या पंधरा दिवसांपूर्वी भालके यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. कालांतराने ते कोरोनामुक्त होऊन घरीही परतले. मात्र, किडनीच्या आजाराने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.