BMM2022 : अमेरिकेतील बीएमएम अधिवेशनात पुण्याचे शारंगधर साठे होणार सहभागी

एमपीसी न्यूज –  भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक प्रा. शारंगधर साठे हे न्यू जर्सीच्या अटलांटिक सिटीमध्ये 11 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या बृहन महाराष्ट्र मंडळ 2022 (BMM2022) या अधिवेशनामध्ये सहभागी होणार आहेत.

परफॉर्मिंग आर्ट्सच्या माध्यमातून भारतातून या अधिवेशनात सहभागी होणारे प्रा. शारंगधर साठे हे एकमेव सदस्य आहेत. संगीत, नृत्य, रंगभूमी, पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि रिसर्च प्रोग्राम तसेच नृत्य दिग्दर्शन या विषयांवर प्रा. शारंगधर साठे बोलणार आहेत. भारती विद्यापीठाद्वारे आणि उत्तर अमेरिकेतील विद्यापीठांद्वारे दुहेरी मान्यता आणि विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा आदान-प्रदान कार्यक्रम या विषयावर देखील ते यावेळी संवाद साधणार आहेत.बृहन महाराष्ट्र मंडळ 2022 अधिवेशनामध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण होण्यासोबतच विविध शैक्षणिक पैलूंवर देखील विचारविनिमय करण्यात येणार आहे.

Bajaj Allianz : चीनला मागे टाकत, बजाज अलायन्झ लाइफ इन्श्युरन्सने ‘GUINNESS WORLD RECORDS™’मध्ये नोंदवला नवा विक्रम

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.