Talegaon Dabhade : शारदीय नवरात्र उत्सव समितीच्या अध्यक्षपदी वीणा दाभाडे

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील शारदीय नवरात्र उत्सव समितीच्या अध्यक्षपदी वीणा विशाल दाभाडे यांची एकमताने निवड करण्यात आली.

संस्थापक अध्यक्षा नीलिमा दाभाडे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. समितीचे यंदा सहावे वर्ष आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर समितीच्या वतीने योग्य खबरदारी घेऊन मर्यादित कार्यक्रम घेतले जाणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्षा वीणा दाभाडे यांनी सांगितले. याप्रसंगी माजी नगरसेविका नीलिमा दाभाडे, पै.विश्वनाथ भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक नंदा दाभाडे उपस्थित होत्या.

नवरात्र उत्सव समितीची स्थापना 2016 साली संस्थेचे संस्थापक नगरसेवक संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील यांनी केली. संस्थेच्या माध्यमातून नवरात्र काळात स्त्री शक्तीचा जागर तसेच विविध धार्मिक कार्यक्रम खास महिलांसाठी लकी ड्रॉ व मनोरंजनासाठी खेळ रंगला पैठणीचा, संगीत खुर्ची, लहान मुलांसाठी डान्स कॉम्पिटिशन व भजनी स्पर्धा तसेच प्रबोधनपर किर्तन  असे कार्यक्रम आयोजित केले जातात.

या निवडीनंतर विणा दाभाडे म्हणाल्या, ‘कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे याहीवर्षी जास्त कार्यक्रम न ठेवता मावळ तालुका स्तरावरती भजनाच्या स्पर्धा घेण्यात येणार आहे व देवीचे श्रीसूक्त पठन घेण्यात येणार आहे.’

याचपार्श्वभूमीवर इतर पदाधिकारी सुद्धा नेमण्यात आले आहे. शारदीय नवरात्र उत्सव समितीच्या उपाध्यक्षपदी ज्योती दाभाडे, खजिनदार कोमल दाभाडे, सचिव अश्विनी दाभाडे, सहसचिव ज्योती दाभाडे आणि चिटणीसपदी सरिता दाभाडे यांची निवड करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.