Shefali Vaidya : पुण्यातील लेखिकेबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याने राष्ट्रवादी पदाधिकारी अटकेत

एमपीसी न्यूज : प्रसिद्ध लेखिका शेफाली वैद्य (Shefali Vaidya) यांच्या फेसबुक पोस्टवर आक्षेपार्ह, अश्लील लिखाण तसेच धमकी देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर पदाधिकाऱ्याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत शेफाली वैद्य तसेच भाजप कार्यकर्त्यांनी पुणे पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. मिलिंद गोरे असे अटक केलेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. 

लेखिका शेफाली वैद्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचा सोलापूर पदाधिकारी मिलिंद गोरे हा शेफाली वैद्य यांच्या पोस्टवर जातीवरुन शिविगाळ करत असे. तसेच, तुझा ‘केतकी चितळे’ करू अशी धमकी देखील देत होता. इतकेच नव्हे तर अश्लील भाषा वापरून चारित्र्यहनन करणाऱ्या मीम करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संबंध जोडून अश्लील कमेंट करत होता. त्यामुळे शेफाली वैद्य यांनी पुणे ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. यासोबतच भाजप सोलापूर कार्यकर्त्यांकडून देखील तक्रार दाखल करण्यात आली. यावर पुणे पोलिसांनी दखल घेत आरोपी मिलिंद गोरे याला ताब्यात घेतले आहे.

Dehuroad News: देहूरोड ते चांदणी चौकापर्यंतच्या कामाचा नवीन ‘डीपीआर’ तयार; लवकरच निविदा प्रसिद्ध होणार – श्रीरंग बारणे

लेखिका शेफाली वैद्य वृत्तपत्र स्तंभलेखक आहेत. त्यांनी मास कम्युनिकेशनमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या मराठी, इंग्रजी, कोकणी तसेच स्पॅनिशमध्ये लिखाण करतात. सोशल मीडियावर त्यांचा चाहतावर्ग असून (Shefali Vaidya) मध्यंतरी त्या ‘नो बिंदी’ या हॅशटॅगमुळे चर्चेत आल्या होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.