Gajanan Maharaj : शेगाव गजानन महाराजांच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खूशखबर

एमपीसी न्यूज :  शेगाव येथील श्री गजानन महाराजांच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी दररोज हजारो भाविक येतात. फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशभरातून भाविकांची इथं गर्दी असते. मंदिर प्रशासनाच्या वतीनं वर्षाला अनेक उत्सव आयोजित करण्यात येतात. (Gajanan Maharaj) त्यामधील रामनवमीचा उत्सव काही दिवसांवर आला आहे. रामजन्मोत्सवाच्या निमित्तानं श्रींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मध्ये रेल्वेने खास भेट दिली आहे.

अकोला रेल्वे स्टेशनवरुन जाणाऱ्या नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अन्य तीन एक्स्प्रेसना प्रायोगित तत्त्वावर सहा महिने शेगाव इथे स्टॉप देण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला आहे. हा प्रयोग सध्या तात्पुरता असला तरी प्रवाशांच्या प्रतिसादानुसार कायमस्वरूपी करण्याची शक्यता आहे.

PMRDA : 23 गावांमधील बांधकाम परवानग्यांअभावी रखडले

31 मार्चपासून पुढील सहा महिने शेगाव रेल्वे स्टेशनवर या एक्स्प्रेस थांबतील.श्री संत गजानन महाराज संस्थान मध्ये श्री रामनवमी उत्सवास प्रारंभ झाला असून या उत्‍सवामध्ये  विविध कार्यक्रमाचे (Gajanan Maharaj) आयोजन करण्यात आले आहे. रामनवमी उत्सवा दरम्यान राज्याच्या कानाकोपऱ्यातुन शेकडो दिंड्या शेगावात दाखल होत असतात. दरवर्षी भाविकांची होणारी प्रचंड गर्दी बघता मध्य रेल्वे प्रशासनाने  हा निर्णय घेण्यात आला आहे.

नागपूर- पुणे-नागपूर एक्स्प्रेस (22141/22142) ही ट्रेन येत्या 31 मार्चपासून शेगावला थांबणार आहे.  अमृतसर-नांदेड एक्स्प्रेसला 28 मार्चापासून, तर 12421 नांदेड-अमृतसर एक्स्प्रेसला 29 मार्च पासून शेगाव स्टेशनवर स्टॉप असेल. गाडी क्र. 12752 जम्मुतावी-नांदेड हमसफर एक्स्प्रेस 27 मार्चपासून ,तर गाडी क्र. 12751 नांदेड-जम्मुतावी हमसफर ही गाडी 31 मार्चपासून शेगाव स्टेशनवर थांबणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.