Shekhar Singh : क्षमता ओळखून ध्येय निश्चित केल्यास नक्कीच यश मिळेल – शेखर सिंह

एमपीसी न्यूज –  स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना (Shekhar Singh) स्वतःची क्षमता ओळखून योग्य वेळी निर्णय घेणे गरजेचे आहे. ध्येय नक्की काय आहे आणि ते आपल्याला का साध्य करायचे, हे अगोदर ठरवून त्या दिशेने वाटचाल करणे आवश्यक आहे. खडतर मेहनत करून विश्वासाने ध्येयाचा पाठपुरावा केल्यास यश निश्चित मिळते, असे मार्गदर्शन महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.  

पिंपरी-चिंचवड महापालिका, पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड आणि डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अर्बन आऊटकम्स फ्रेमवर्क 2022’ अंतर्गत पिंपरी येथील डॉ.डी.वाय.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सभागृहामध्ये विद्यार्थ्यांसाठी ‘लक्षवेध- क्रॅकिंग द कोड’ हा मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी आयुक्त बोलत होते. सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले, डॉ.डी.वाय.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पिंपरीचे सचिव डॉ. सोमनाथ पाटील, फॉक्सबेरीचे सीईओ अंकित भार्गव, फार्मदीदी संस्थेचे सहसंस्थापक अनुक्रीत जोहारी या मान्यवरांनी प्रमुख वक्ते म्हणून विद्यार्थ्यासोबत संवाद साधला.

प्राचार्य डॉ.एल.के. वाधवा, कार्यकारी संचालक प्रा. अविनाश ठाकूर, डीन प्रा. धीरज अग्रवाल, उपायुक्त रविकिरण घोडके, विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह स्मार्ट सिटी व स्मार्ट सारथी टीमचे प्रतिनिधी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आयुक्त शेखर सिंह पुढे म्हणाले, कॉलेज जीवनात (Shekhar Singh) अभ्यासाबरोबरच खेळ, कल्चरल इव्हेंटमध्ये सहभागी होणे गरजेचे आहे. यामुळे व्यक्तिमत्व विकास सर्वांगाने घडण्यास मदत होते. कोणत्याही स्पर्धा परीक्षा देताना विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी प्रयत्नशील रहायला हवे. स्पर्धा परीक्षा देताना वेळेची मर्यादा बांधून घेणे आवश्यक आहे.

लोकसेवेत कार्यरत असताना अनेक गोष्टींचा त्याग करावा लागत असून त्यासाठी मनाची तयारी असणे आवश्यक आहे. स्पर्धा परिक्षेची तयारी करताना काय वाचू नये हे कळणे महत्त्वाचे आहे. रोजचे वर्तमानपत्र वाचल्याने नकळत आपल्या ज्ञानात भर पडत असते. सोशल मिडीयाचा वापर योग्य पद्धतीने करावा. स्पर्धा परीक्षेत अपयश आले म्हणून खचून न जाता आपल्या आवडत्या क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करायला हवे, मेहनत हा यशाचा खरा मार्ग आहे, असे त्यांनी सांगितले.
Andhra Bhama Askhed : आंद्रा, भामा-आसखेड प्रकल्पाच्या आढाव्यासाठी समन्वय समिती

सहायक पोलिस आयुक्त श्रीकांत दिसले म्हणाले, कॉलेज जिवनात विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळी ऊर्जा असते. एखादे ध्येय मनापासून ठरवून त्यासाठी जिद्दीने प्रयत्न केले तर यशाचे शिखर नक्की गाठता येते. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना प्लान बी देखील तयार असावा. स्पर्धा परीक्षेत अपयश आले तरी स्वतःचा व्यक्तिमत्व विकास उत्तम झालेला असतो जो आपल्याला कोणत्याही क्षेत्रात यश मिळविण्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरतो.

https://youtu.be/mXPv3Pv53Fc

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.