Shelarwadi News : शेलारवाडी गावातील जनावरांच्या अठरा गोठ्यांवर लष्कराचा हातोडा

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेट बोर्डाच्या वाॅर्ड क्र 1 मधील शेलारवाडी येथील सुमारे अठरा गोठ्यांवर लष्करी जवानांनी गुरूवार (दि 8)बुलडोझर फिरवला. या कारवाईमुळे ग्रामस्थांचा दुग्ध व्यवसाय संपुष्टात आला आहे. त्या दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातूनच या सर्व कुटुंबांचा उदरनिर्वाह चालू होता. याबाबत ग्रामस्थांनी वरीष्ठ अधिका-यांकडे निवेदन दिले आहे.

_MPC_DIR_MPU_II

शेलारवाडी गावाच्या उत्तरेला लष्कराची हद्द आहे. या परिसरात अनेक शेतक-यांनी जनावरांसाठी गोठे बांधले आहेत. गुरूवारी (दि 8) दुपारी लष्करी जवानांच्या पथकाने या भागातील 18 गोठ्यांवर बुलडोझर फिरवला. गावातील काही ज्येष्ठ मंडळीनी कारवाई थांबविण्याची विनंती केली, परंतु जवानांनी त्याकडे दुर्लक्ष करत गोठे भुईसपाट केले.

या प्रकाराबाबत शेलारवाडी ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. गावक-यांनी बांधलेले तात्पुरत्या स्वरूपातील गोठे वर्षानुवर्षे या ठिकाणी आहेत. अचानक त्यांच्यावर कारवाई करून लष्कराने शेतक-यांच्या भावनेचा अनादरच केला आहे. अशा आशयाची तक्रार निवेदनाद्वारे ब्रिगेडियर संजय खन्ना, कॅन्टोन्मेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांच्याकडे करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.