मंगळवार, डिसेंबर 6, 2022

Shikrapur girl murder : बापानेच घेतला पोटच्या मुलीचा जीव, 5 दिवसानंतर नदीत सापडला मृतदेह

एमपीसी न्यूज : शिक्रापूर येथे बापानेच पोटच्या मुलीला नदीत फेकून तीचा जीव घेतला आहे.  या मुलीला शोधण्याचा प्रयत्न केला असता आज 5 दिवसानंतर या मुलीचा मृतदेह नदीत सापडला आहे.(Shikrapur girl murder) अशी माहिती नितीन अटकरे,  पोलीस निरीक्षक शिक्रापूर पोलीस ठाणे यांनी दिली आहे.

याविषयी प्राथमिक माहिती देताना, अटकरे म्हणाले की युवराज सोळुंके यांनी 27सप्टेंबर रोजी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की त्यांची मुलगी अपेक्षा ही बेपत्ता आहे. पोलिसांच्या तपासामध्ये कळाले की, युवराज सोळुंके यांनी स्वतः त्यांच्या स्वतःच्या सात वर्षीय मुलगी अपेक्षा सोळुंके हिला पोत्यात बांधून वेळु नदीवरील बांधाऱ्यावरून खाली नदीत फेकले होते.

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी; आत्मघातकी स्फोट घडवून मारण्याचा कट

त्यानंतर स्थानिक नागरिकांनी व मासेमारांनी नदीमध्ये मुलीच्या मृतदेहाचा शोध घेतला मात्र काहीच हाती लागले नाही. त्यामुळे पोलिसांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्था व (Shikrapur girl murder) शिवदुर्ग मित्र लोणावळा या संस्थांना मदतीला घेत शोध मोहिम सुरू केली. अखेर या संस्थांच्या सदस्यांनी आज दुपारी त्या मुलीचा मृतदेह शोधून काढला आहे.

Latest news
Related news