Shikrapur: मुलगी पळवल्याचा रागातून संपूर्ण गावासमोर मुलाच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण

Shikrapur: The boy's family was beaten in front of the entire village out of anger over the abduction of the girl मुलगी पळवून नेली मुलाने अन् मारहाण केली त्याच्या आई-वडील, भाऊ आणि बहिणीला!

एमपीसी न्यूज – एका तरुणाने केलेल्या कृत्याची शिक्षा त्याच्या संपूर्ण कुटुंबाला देण्याची धक्कादायक घटना शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. मुलगी पळून गेल्याच्या रागातून मुलीच्या कुटुंबीयांनी संपूर्ण गावासमोर मुलाच्या सर्व कुटुंबीयांना जबर मारहाण केली. शिरूर तालुक्यातील घोलपवाडी करपे वस्ती येथे ही घटना 22 जुलै रोजी घडली. 

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी सुरेखा संभाजी करचे (वय 40) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी लक्ष्मी चौधरी, रोहिदास चौधरी, सुभाबाई चौधरी, संदीप चौधरी सुनील चौधरी यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्या मुलाने आरोपीच्या मुलीला पळवून नेले. हाच राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी यांच्यासह त्यांचे पती मुलगा आणि मुलगी यांना संपूर्ण गावासमोर झाडू , चप्पल  लाकडी काठी आणि आणि हाता पायाने जबर मारहाण केली. पोलिसांनी या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक शेलार करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.