Shilpa Shetty’s dance video : शिल्पाचा डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर त्यावर लाइक्सचा वर्षाव

After Shilpa's dance video went viral

एमपीसी न्यूज – आपल्या आजही राखलेल्या फिटनेसमुळे शिल्पा शेट्टी कायम चर्चेत असते. ती तिचे योगाचे व्हिडिओ नेहमी शेअर करत असते. तिचे स्वतचे यू ट्यूब चॅनेल देखील आहे. तिचा नवरा, मुले यांना कायमच स्पेशल महत्व दिले जाते. किंबहुना शिल्पा हे सगळं नेहमी चर्चेत कसे राहिल याची काळजी घेत असते. यावेळी शिल्पा तिच्या एका गाण्यामुळे प्रसिद्धीत आहे.

शिल्पा शेट्टी सध्या जपानमध्ये आहे. तिने जपानमधील क्योटो शहरातील रस्त्यावर एक व्हिडीओ शूट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती ‘बाजीगर’ या चित्रपटातील ‘ऐ मेरे हमसफर ऐ मेरी जाने जा’ या गाण्यावर नृत्य करताना दिसत आहे. काही तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. अनेकांनी शिल्पाचे हे नृत्य पाहून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

‘बाजीगर’ हा शिल्पा शेट्टीच्या करिअरमधील सुपरहिट चित्रपटांपैकी एक होता. तिने या चित्रपटात तिची भूमिका फारशी मोठी नव्हती. परंतु या छोट्याशा भूमिकेतही ती भाव खाऊन गेली. मात्र बाजीगर नंतर शिल्पाला अनेक चित्रपट मिळाले. म्हणजे एका अर्थाने हे शिल्पाच्या करियरचा माइलस्टोन मूव्ही आहे. यात अभिनेता शाहरुख खानची भूमिका खलनायकाच्या जवळ जाणारी होती. त्याने यात अन्याय झालेला हिरो साकारला होता. शिल्पावर चित्रित झालेले ‘ऐ मेरे हमसफर, ऐ मेरी जाने जा’ हे गाणं त्याकाळी प्रचंड लोकप्रिय झालं होतं. शिल्पाच्या या व्हिडीओमुळे हे गाणं पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

विडिओ पाहण्यासाठी येथे क्लीक करा 

https://www.instagram.com/reel/CCprl3qhMzs/?igshid=owuc7qaxrzzk

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.