Sanjay Raut : शिंदे गटाने 24 तासात परत यावे – खासदार संजय राऊत

एमपीसी न्यूज : शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना आवाहन केले आहे, की तुम्ही 24 तासात परत या. आपण चर्चा करून यावर तोडगा काढू. आणि एकमताने निर्णय घेऊ. 

Eknath Shinde Update : “पत्रास कारण की…” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बंडखोर आमदारांकडून पत्र

काही वेळापूर्वी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये संजय राऊत यांनी ‘आमदार म्हणजे पक्ष नव्हे’ असा बंडखोर आमदारांना टोला लगावला होता. परंतु, लगेचच त्यांनी यूटर्न घेतल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच आमदारांना त्यांनी चर्चेसाठी सत्ता टिकवण्यासाठी परत येण्याचे आवाहन करत आहेत. काही आमदारांचे हॉटेलमधले, पत्ते खेळतानाचे फोटो पाहायला मिळत आहेत. त्यांना जे करायचे ते करू दे (Sanjay Raut) पण ते मुंबईत येतील तेव्हा ते शिवसेनेचे आमदार असतील असेही राऊत म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.