_MPC_DIR_MPU_III

Pune : कोथरूडमध्ये शिंदे की पाटील?

गुरुवारी येणार निकाल ; इंजिन जोरात धावल्याची चर्चा

एमपीसी न्यूज – कोथरूड मतदारसंघात भाजपची मोठी ताकद असतानाही मनसेने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना घाम फोडला. आज मतदानाच्या दिवशी मनसेचे इंजिन जोरात धावल्याची चर्चा सुरू आहे. पाटील यांना कोणत्याही परिस्थितीत कोथरूडमध्येच अडकवून ठेवण्याचा डाव राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आखला. तो यशस्वी झाल्याची कुजबूज आहे.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

मनसेला काँगेस, राष्ट्रवादीने साथ दिली. याचा निकाल गुरुवारी (24 ऑक्टोबर) येणार आहे. पाटील हे राज्यातील क्रमांक दोनचे नेते आहेत. सुरुवातीपासूनच त्यांच्या उमेदवारीला विरोध होता. आज पाटील सकाळपासूनच कोथरूडमध्ये ठाण मांडून बसून होते.

भाजपच्या कोथरूडमधील नगरसेवकांना वरिष्ठ नेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत पाटील निवडून आलेच पाहिजे. त्यासाठी रात्र दिवस काम करा, असा दम दिल्याची कोथरूडमध्ये खमंग चर्चा सुरू आहे. मनसेचे उमेदवार, माजी नगरसेवक किशोर शिंदे यांनी कार्यकर्त्यांच्या भरवशावर घरोघरी जाऊन प्रचार केला.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.