Pimpri : परिमंडळ तीनच्या पोलीस उपायुक्त पदावर शिंदे गेले शिंदे आले

मंगेश शिंदे यांनी पोलीस उप आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला

एमपीसी न्यूज – पुणे पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ तीनचे पोलीस उप आयुक्त म्हणून मंगेश शिंदे यांनी पदभार स्वीकारला. पोलीस उप आयुक्त गणेश शिंदे यांनी मंगेश शिंदे यांच्याकडे पोलीस उप आयुक्त पदाची सूत्रे सोपविली. त्यामुळे परिमंडळ तीनच्या पोलीस उप आयुक्त पदावर शिंदे गेले आणि शिंदे असा योगायोग आला आहे.

परिमंडळ तीनचे पोलीस उप आयुक्त गणेश शिंदे यांची मुंबई शहर पोलीस उप आयुक्त पदावर बदली करण्यात आली आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या पुणे शहर परिमंडळ तीनच्या पोलीस उप आयुक्त पदावर मंगेश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या गृह विभागाने शुक्रवार (दि. 27 जुलै) रोजी काढलेल्या आदेशान्वये (शासन आदेश क्रमांक : रापोसे-1718/प्र.क.196/पोल 1(अ)) भारतीय पोलीस सेवा, राज्य पोलीस सेवेतील पोलीस अधीक्षक आणि पोलीस उप आयुक्त पदावरील 95 अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे परिमंडळ तीनचे पोलीस उप आयुक्त गणेश शिंदे यांची पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर येथे बदली करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.