Pimpri News : लाल दिवा लावून शायनींग करणे पडले महागात;पोलिसांची दोघांना नोटीस

एमपीसी न्यूज – आपल्या गाडीवर लाल दिवा असावा असे कोणाला वाटणार नाही. मात्र मंडळी त्या लाल दिव्यासाठी तुम्हाला एक तर सरकारी अधिकारी व्हाव लागत किंवा मंत्री. मात्र असे काही नसताना तुम्ही जर लाल दिवा लावत असाल तर सावधान तुम्हाला पोलिसांची नोटीस येवू शकते.

 

 

 

असेच एक नवाब मंगळवारी (दि.2) पिंपरी येथे त्यांच्या खासगी गाडीवर विनापरवाना लाल दिवा लावून गाडी फिरवत होते. वर तो चालू करून रोडवर मस्त रपेट सुरु होती. तुम्ही भरदिवसा दिवा लावून फिरणार अन पोलिसांची नजर नाही पडणार असे कसे होईल. मग काय ऑटोक्लस्टरजवळ असताना पोलिसांनी हटकले तर गाडीमध्ये एक 17 वर्षाचा मुलगा तर दुसरा 18 वर्षाचा.पोलिसांना कपाळावर हात मारण्याची वेळ आली. पोलिसांनी त्यातील गाडी चालक 18 वर्षीय मुलगा साहिल गौतम आडसूळ याला नोटीस बजावली असून तो लाल दिवा ताब्यात घेतला.

 

 

Aditya Thackeray : काही गद्दार आज जिल्ह्यात फिरत आहेत, नाव न घेता आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा

 

त्यामुळे तुम्हाला ही लाल दिव्याची हौस असेल तर एक स्पर्धा परिक्षा द्या अन्यथा निवडणूकांना उभे रहा. कारण मेहनत केल्याशिवाय काही मिळत नाही मिळते फक्त पोलिसांची नोटीस.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.