Chikhali : अल्पवयीन मुलीला पळवून नेल्या प्रकरणी एकाला बेड्या

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणा-या एका तरुणाला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी अटक केली.

शुभम साहेबराव येळवंडे (वय 23, रा. निघोजे, ता. खेड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार शिवानंद स्वामी यांना माहिती मिळाली की, चिखली पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यातील आरोपी थरमॅक्स चौक परिसरात थांबला आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून शुभम याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून अल्पवयीन; मुलीची सुटका केली. आरोपीला पुढील कारवाईसाठी चिखली पोलिसांकडे देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार, पोलीस कर्मचारी दिलीप चौधरी, संपत निकम, शिवानंद स्वामी, केराप्पा माने, उषा दळे, आतिष कुडके, शिवाजी मुंडे, अजित सानप, नामदेव राऊत यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.