Shirdi News : तृप्ती देसाईंना शुक्रवारपर्यंत शिर्डीत नो एंट्री, उपविभागीय दंडाधिकार्‍यांचा आदेश

एमपीसीन्यूज : शिर्डीतील साईबाबा मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी भारतीय पोशाखात यावे, अशी विनंतीवजा सूचना साईबाबा संस्थानने केली आहे. यावरून आता मोठा वाद पेटला आहे. भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी तर हा बोर्ड संस्थानने काढला नाही तर आम्ही स्वतः येऊन काढू असा इशाराच दिला आहे. त्यानंतर आता शिर्डीच्या उपविभागीय दंडाधिकारी तृप्ती देसाई यांना शुक्रवार पर्यंत शिर्डीत प्रवेश न करण्याचे आदेश दिले आहेत.

शिर्डीतील तो फलक संस्थानने न काढल्यास आपण स्वतः दहा डिसेंबरला 10 डिसेंबरला शिर्डीत येऊन तो बोर्ड काढू असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला होता. त्यानंतर राजकारण पेटले होते.

_MPC_DIR_MPU_II

पुण्यातील ब्राह्मण महासंघाच्या महिला आघाडीने तृप्ती देसाईंना तोडीसतोड उत्तर देणार असल्याचा इशारा दिला होता. तर शिर्डीतील शिवसेना महिला आघाडीने देसाईंनी शिर्डी शहरात प्रवेश केल्यास तोंडाला काळे फासू, असा इशारा दिला होता.

दरम्यान, शिर्डी साईबाबा देवस्थानच्या वतीने हा फलक अनेक दिवसांपासून मंदिर परिसरात असून त्याला आतापर्यंत एकाही साईभक्तांनी आक्षेप घेतला नाही. त्यामुळे हा फलक काढण्याचा प्रश्नच येत नसल्याचे संस्थानने पोलिस विभागाला कळवले आहे.

त्यामुळे तृप्ती देसाई हा बोर्ड काढण्यासाठी शिर्डी येथे आल्या तर धार्मिक तेढ निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तृप्ती देसाई यांनी शिर्डी नगरपंचायतीच्या हद्दीत 8 डिसेंबर ते 11 डिसेंबर या कालावधीत प्रवेश करू नयेत, असे आदेश शिर्डीच्या उपविभागीय दंडाधिकारी यांनी दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.