Shirgaon : हातभट्टीची दारू निर्मी्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल, 4 लाखांचे रसायन केले नष्ट

 

एमपीसी न्यूज – हातभट्टीची दारु निर्मिती प्रकरणी एका (Shirgaon)महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सोमवारी (दि.12) शिरगाव पवना नदीच्या काठी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 5 यांनी केली आहे.

याप्रकरणी महिलेवर शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा (Shirgaon)दाखल केला असून पोलीस शिपाई भरत श्रीमंत माने यांनी गुन्हा दाखल केला आहे.

Chinchwad : वल्लभनगर एस टी स्टँड जवळून एकाला 4 लाख रुपयांच्या गांजासह अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ही कोणत्याही परवानगी शिवाय पवना नदीकाठी हातभट्टीवर दारु निर्मिती करत होती. पोलिसांनी तेथे छापा टाकून 4 लाख 500 रुरुपयांचे 400 ली. गुळाचे मिश्रण रसायन घालून भिजत घातलेले मिश्रण नष्ट केले.

यावेळी कारवाई सुरु असताना आरोपी महिला ही झाडा-झुडपा मधून पळून गेली. शिरागाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.