Shirgaon : हातभट्टी दारू तयार करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – हातभट्टी दारू तयार करण्यासाठी (Shirgaon) तरुणाने भट्टी लावली. याबाबत माहिती मिळाली असता शिरगाव पोलिसांनी कारवाई करत सहा लाख पंच्याऐंशी हजारांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 22) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास मुंबई पुणे द्रुतगती मार्गाच्या बाजूला शिरगाव येथे करण्यात आली.

रुपेश ईश्वर पवार (वय 26, रा. कंजारभाट वस्ती, शिरगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार समाधान फडतरे यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune : पुण्यात आज लाक्षणीक हेल्मेट दिवस

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रुपेश पवार याने हातभट्टी दारू तयार करण्यासाठी मुंबई पुणे द्रुतगती मार्गाच्या बाजूला भट्टी लावली. याबाबत शिरगाव पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी दारू भट्टीवर छापा मारून कारवाई केली.

पोलिसांची चाहूल लागताच रुपेश पवार हा पळून गेला. पोलिसांनी या कारवाई मध्ये आठ हजार लिटर कच्चे रसायन, 245 लिटर तयार हातभट्टीची दारू, पत्राच्या टाक्या, ॲल्युमिनियमचे भांडे असा एकूण सहा लाख 85 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. शिरगाव पोलीस तपास करीत (Shirgaon) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.