Shirgaon-Maval : माजी उपसरपंच धनाजीराव अरगडे यांच्या ‘सुद्रा’ कालवाडीचा वाढदिवस उत्साहात

एमपीसी न्यूज – प्रतिशिर्डी शिरगाव मावळ येथील प्रगतशील शेतकरी आणि माजी उपसरपंच धनाजीराव अरगडे यांनी त्यांच्याकडे असलेल्या ‘सुद्रा’ कालवाडीचा वाढदिवस उत्साहात साजरा केला. परिसरात त्यांच्या या कालवडीच्या वाढदिवसाची चर्चा आहे.

या कालवडीची आई जन्म देऊन दोन तासात मरण पावली परंतु धनाजीराव अरगडे आणि त्यांचे चिरंजीव प्रमोद अरगडे यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून कालवडीला जगवली. तिला बाटलीने दूध पाजले.

सुरुवातीचे एक महिनाभर रात्रीचे घरातच सांभाळ केला. एकीकडे बैलगाडा शर्यत बंद असून सुद्धा शेतकरी पोटच्या पोराप्रमाणे जनावरांचा सांभाळ करतात त्याचे हे एक उदाहरण म्हणता येईल.

आजच्या आधुनिक युगात आपल्या देशी गायी खूप कमी झाल्या आहेत. आपला गोवंश टिकला तर शेतकरी व पर्यावरण टिकेल, असे मत धनाजीराव अरगडे यांनी व्यक्त केले. सध्या त्यांच्याकडे ४६ म्हशी,६ गाई आणि एक बैलजोडी आहे. सर्व शेती ते सेंद्रिय पद्धतीने करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.