Shirgaon Murder News : शिरगावच्या साई मंदिरासमोर राष्ट्रवादीच्या सरपंचाचा निर्घृण खून

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील शिरगाव येथील सरपंचावर कोयत्याने वार करत त्यांचा निर्घृणपणे खून (Shirgaon Murder News) करण्यात आला. ही घटना शनिवारी (दि. 1) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास शिरगाव येथील साई मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर घडली.

प्रवीण साहेबराव गोपाळे (वय 47) असे खून झालेल्या सरपंचाचे नाव आहे.

शिरगाव ग्रामपंचायतीची निवडणूक काही महिन्यांपूर्वीच झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रवीण गोपाळे सरपंचपदी विजयी झाले होते. त्यांचा प्लाॅटिंगचा व्यवसाय होता. त्यातूनच त्यांचा काही जणांशी वाद होता.

Lonavala : लोणावळ्याजवळील कुणेनामा ग्रामपंचायतीच्या सदस्याला मारहाण

गोपाळे हे शनिवारी रात्री त्यांच्या दुचाकीवरून शिरगाव येथील साई मंदिरासमोर आले. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर गोपाळे गप्पा मारत थांबले असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांच्यावर कोयत्याने वार केले. वार चुकविण्यासाठी गोपाळे पळत असताना हल्लेखोरांनी गोपाळे यांचा पाठलाग करून पुन्हा वार करत त्यांना गंभीर जखमी केले. त्यातच गोपाळे यांचा मृत्यू (Shirgaon Murder News) झाला. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून पळून गेले.

घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गोपाळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. त्या आधारे आरोपींचा माग काढण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण मावळ परिसरात खळबळ उडाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.