Shirgaon News : इंदिरा कॉलेजच्यावतीने माई बाल भवनातील दिव्यांगांना शैक्षणिक साहित्य वाटप

एमपीसीन्यूज : ताथवडे येथील इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स आणि राष्ट्रीय सेवा योजना यांचा वतीने शिरगाव ( ता. मावळ) येथील माई बाल भवनातील दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. एकूण 30  दिव्यांग विद्यार्थ्यांना हे साहित्य वाटप करण्यात आले.

इंदिरा कॉलेजचे प्राचार्य डॉ. जनार्दन पवार, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी सुमित ससाणे, डॉ. चंद्रकांत पवार, डॉ. किशोर पठारे, माई बाल भवनाच्या प्रज्ञा देशपांडे , राष्ट्रीय फुटबॉलपटू आलोक शर्मा आदी उपस्थित होते.

माई बाल भवनात 30  दृष्टिहीन विद्यार्थी आणि विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना शैक्षणिक साहित्य आणि दैनंदिन जीवनावश्यक साहित्याची गरज असते. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये. त्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेले शैक्षणिक साहित्य वेळेवर उपलब्ध व्हावे, या भावनेतून इंदिरा कॉलेज आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्यावतीने या दृष्टीहीन विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली.

यावेळी या विद्यार्थ्यांना मिठाई आणि बिस्किटांचेही वाटप करण्यात आले. या मदतीबद्दल विद्यार्थी आणि संस्थेच्यावतीने इंदिरा कॉलेजचे आभार मानण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.