Shirur: थोर महापुरुषांच्या यादीत छत्रपती संभाजी महाराजांचे नाव समाविष्ट करा; डॉ. अमोल कोल्हे यांची मागणी

Shirur: Add the name of Chhatrapati Sambhaji Maharaj to the list of great men in Maharashtra - MP Dr. Amol Kolhe

एमपीसी न्यूज – राज्य सरकारने तयार केलेल्या थोर महापुरुषांच्या दिनविशेष यादीत छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्याकडे शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे. याबाबतीत लक्ष घालून शासनाने सुधारणा करावी अशी विनंती त्यांनी केली आहे.

छत्रपती संभाजी महाराजांची 359 वी जयंती 14 मे रोजी (तारखेप्रमाणे) साजरी करण्यात येणार आहे. त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शासनाने दिनविशेष यादीत सुधारण करुन  छत्रपती संभाजी महाराजांचे नाव थोर महापुरुषांच्या यादीत समावेश करण्याची मागणी केली आहे.

याबाबत डॉ. कोल्हे यांनी मंगळवारी ट्विटवरुन छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख राज्य सरकारच्या महापुरुषांशी संबंधित दिनविशेष यादीत नसल्याचे निर्दर्शनास आणून दिले. ‘महाराष्ट्राच्या ज्वलंत इतिहासात छत्रपती संभाजी महाराजांचं योगदान न विसरण्याजोगं आहे. शासनाने थोर महापुरुषांची दिनविशेष यादी बनवली आहे. त्यात छत्रपती संभाजी राजेंच्या नावाचा उल्लेख नाही.

विनंती आहे की त्वरित याबाबतीत लक्ष घालून शासनाने सुधारणा करावी, असे कोल्हे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.