Shirur : शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव आणि राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे आमने सामने

संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीवेळी शिरुरमधील प्रतिस्पर्धी उमेदवारांची भेट

पालकमंत्री गिरीश बापट यांनी घेतली कोल्हे यांची गळाभेट

एमपीसी न्यूज – शिरूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांची आज ( शुक्रवारी) समोरा समोर भेट झाली. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी वेळी शिरूर लोकसभेच्या या दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांची भेट घडली.

तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराज यांना आदरांजली वाहण्याकरिता सर्वच पक्षाचे उमेदवार आणि नेते तिथे येत आहेत. तिथेच शिवसेना उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांची भेट झाली. यावेळी दोघांनी हस्तांदोलन केले. तसेच पालकमंत्री आणि पुण्याचे भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांनीही कोल्हे यांची गळाभेट घेतली.

उमेदवारी जाहीर झाल्यापासून शिवाजीराव आढळराव आणि डॉ. अमोल कोल्हे यांच्यात आरोप- प्रत्यारोप सुरू होते. एकमेकांवर टीका केली जात होती. त्यानंतर आज दोघेही समोरा समोर आल्यावर उपस्थितीताच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या. दोघांनीही हस्तांदोलन केले. यावेळी आमदार शरद सोनवणे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.