Shirur: खिलाडू वृत्ती ! आढळरावांनी डॉ. अमोल कोल्हे यांचे केले अभिनंदन

पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा

एमपीसी न्यूज – शिरुर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांचे त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अभिनंदन केले. त्यांना पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा दिल्या आहेत. आढळराव यांनी राजकारणातील खिलाडू वृत्ती, राजकीय प्रगल्भता दाखवून दिली.

शिरुर लोकसभा मतदारसंघाचे दोनवेळा आणि पूर्वीच्या खेड मतदारसंघाचे शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव यांनी संसदेत 15 वर्ष प्रतिनिधत्व केले होते. चौथ्यावेळी आढळराव यांचा संसदेचा मार्ग डॉ. कोल्हे यांनी रोखला. डॉ. कोल्हे यांना शिरुर, जुन्नर, आंबेगावर आणि खेड-आळंदी मतदारसंघातून चांगले मताधिक्य मिळाले. भोसरी आणि हडपसर या शहरी भागातून आढळराव यांना मताधिक्य मिळाले. पण, हे मताधिक्य डॉ. कोल्हे यांचे लीड तोडू शकले नाही. त्यामुळे आढळराव यांचा 58 हजार 483 मतांनी पराभव झाला.

शिवाजीराव आढळराव पाटील यांनी विजयी उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना शुभेच्या दिल्या आहेत. डॉ. कोल्हे हे शिरुर लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्याबद्दल यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छांची पोस्ट  त्यांनी स्वतःच्या  फेसबुक पेजवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी स्वतःचा आणि आढळरावांचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी अमोल कोल्हे यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.