Shirur: पहिल्याचवर्षी ‘संसद रत्न’ पुरस्कार जाहीर झाल्यानंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणतात…

Shirur: After the announcement of 'Sansad Ratna' award in the first year, MP Dr. Amol Kolhe says मतदारसंघातील माय-बाप जनतेने माझ्यावर विश्वास टाकला. एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलाला संसदेत पाठवले त्या प्रत्येक व्यक्तीचा हा पुरस्कार आहे.

एमपीसी न्यूज- लोकसभेतील अष्टपैलू कामगिरीबद्दल शिरुर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. पहिल्याच टर्मच्या पहिल्याचवर्षी हा पुरस्कार मिळणे आनंदाची गोष्ट आहे. मतदारसंघातील माय-बाप जनतेने माझ्यावर विश्वास टाकला. एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलाला संसदेत पाठवले त्या प्रत्येक व्यक्तीचा हा पुरस्कार आहे. जनतेला हा पुरस्कार त्यांनी अर्पण केला आहे.

लोकसभेत विविध विषयांवर उपस्थित केलेले प्रश्‍न, सर्वाधिक चर्चेतील सहभाग संसदेमधील उपस्थिती तसेच स्थानिक खासदार विकास निधीचा वापर या अष्टपैलू कामगिरीबद्दल राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना चेन्नई येथील पंतप्रधान पाँईंट फाऊंडेशनच्या वतीने ‘संसद रत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे.

त्यावर खासदार डॉ. कोल्हे यांनी फेसबुकवर व्हिडिओ अपलोड करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यात खासदार कोल्हे म्हणतात, पहिल्याच टर्मच्या पहिल्याचवर्षी हा पुरस्कार मिळणे आनंदाची गोष्ट आहे.

पण, जेवढी आनंदाची गोष्ट आहे. तेवढी जबाबदारीची जाणीव मानतो. दोन दिवसांपूर्वीच परिवर्तन या संस्थेच्या पाहणी अहवालात लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारणा-या खासदारांमध्ये टॉप फाईव्हमध्ये माझा समावेश झाला. त्यापाठोपाठ ही दुसरी आनंदाची बातमी आली.

पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लोकसभेतील गटनेत्या सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ही संधी दिली. त्यामुळेच हा आनंद सर्वांसमोर शेअर करु शकत आहे.

हा पुरस्कार माझा नाही. शिरुर लोकसभा मतदारसंघातील माय-बाप जनतेने माझ्यावर विश्वास टाकला. एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलाला संसदेत पाठवले त्या प्रत्येक व्यक्तीचा हा पुरस्कार आहे.

मतदारसंघातील जनतेला हा पुरस्कार कृतज्ञतापूर्वक आणि नम्रतेने अर्पण करतो. याचपद्धतीने मतदारसंघातील, देशपातळीवरील, राज्य पातळीवरील प्रश्न सातत्याने मांडेल. संसदेत वेगवेगळ्या विषयांवर आवाज उठविण्यासाठी मी कटिबद्ध राहील, अशी ग्वाही देतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like