Shirur: विजयानंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे किल्ले शिवनेरीवर!

छत्रपती शिवाजी महाराज यांना केले अभिवादन

एमपीसी न्यूज – शिरुर लोकसभा मतदारसंघातून जाइंट किलर ठरत विजय मिळविल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज (शुक्रवारी) छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीवर गेले. तेथे छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊं यांना अभिवादन करून कामाला सुरुवात केली.

शिरुर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात डॉ. अमोल कोल्हे यांनी घवघवयीत यश मिळवले. शिवसेनेच्या बालेकिल्ला उद्धवस्त केला. 15 वर्षांपासून खासदार असलेले शिवाजीराव आढळराव-पाटील यांचा पराभव केला. 60 हजाराच्या मताधिक्याने डॉ. कोल्हे विजयी झाले.

  • विजयानंतर डॉ. कोल्हे यांनी शिवनेवरीवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. शिरुर लोकसभा मतदारसंघाची शिवभूमी म्हणून एक वेगळी ओळख असल्याने या शिवभूमीत एक आगळावेगळा शिवजन्मोत्सव साजरा केला जाईल. या शिवजन्मोत्सवाची चर्चा संपूर्ण देशात असेल, असे डॉ. अमोल कोल्हे यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.