Shirur: सर्वाधिक प्रश्न विचारणा-यांमध्ये राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे दुस-या क्रमांकावर

Among those who asked the most questions was NCP MP Dr. Amol Kolhe is second

खासदार सुप्रिया सुळे यांनी पटकाविला पहिला क्रमांक, राज्यातील तीन खासदारांचा टॉप फाईव्हमध्ये समावेश

एमपीसी न्यूज – लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारणा-यांमध्ये पहिल्यांदाच निवडून आलेले शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आघाडीवर आहेत. 202 प्रश्न उपस्थित करत कोल्हे यांनी दुसरा क्रमांक पटकाविला आहे. तर, सर्वाधिक 212 प्रश्न विचारत बारामतीच्या राष्ट्रवादीच्याच खासदार सुप्रिया सुळे पहिल्या क्रमांकावर आहेत. राज्यातील तीन खासदारांचा टॉप फाईव्हमध्ये समावेश झाला आहे.

तीसरी टर्म असलेल्या बारामतीच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी 212 प्रश्न लोकसभेत विचारले आहेत. तर, पहिल्यांदाच निवडून आलेले शिरूरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी 202 आणि धुळ्याचे भाजप खासदार सुभाष भामरे यांनीही 202 प्रश्न उपस्थित केले आहेत.

मध्य प्रदेशातील मंदसौर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार सुधीर गप्ता यांनी 198 तर झारखंडमधील जमदेशपूर मतदारसंघातील भाजपचे खासदार बिद्युत महतो यांनी 195 प्रश्न उपस्थित केले आहेत.

शिवसेनेचे मुंबई उत्तर पूर्वमधील खासदार गजानन किर्तीकर यांनी 195 प्रश्न उपस्थित करून चौथा क्रमांक पटकाविला आहे. मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी 194 प्रश्न विचारून पाचवा क्रमांक मिळविला  आहे.

पुण्यातील परिवर्तन या स्वयंसेवी संस्थेने ऑनलाईन पत्रकार परिषदेत या बाबतची माहिती दिली. लोकसभेतील अपडेटसची 31 मे पर्यंतची दखल संस्थेने घेतली आहे. त्याबाबतची माहिती परिवर्तनच्या अध्यक्ष अंकिता अभ्यंकर, समन्वयक तन्मय कानिटकर आणि सायली दोडके यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.